🌦️ पुढील 72 तास धोक्याचे, महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; IMD कडून ‘यलो अलर्ट’ जारी
🔸 महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसाने शेतीचे मोठे नुकसान केले होते. आता पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे. पुढील 72 तास राज्यातील हवामान धोक्याचे ठरण्याची शक्यता असून नागरिकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. दक्षिण-पश्चिम अरबी समुद्रात लक्षद्वीपजवळ हवेची द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*📅 यंदा लक्ष्मीपूजनाची खरी तारीख कोणती ? 20 की 21 ऑक्टोबर ?*
*💁🏻♂️ शुभ मुहूर्त काय ? ‘या’ वेळी पूजन केल्यास घरात नांदेल समृद्धी*
👇🏻
youtu.be/GmhnMmN2c7o
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔸 19 ऑक्टोबरपर्यंत ही स्थिती कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतरित होण्याची शक्यता असून याचा थेट परिणाम महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागावर होणार आहे. या बदललेल्या हवामान स्थितीमुळे कोकण, रत्नागिरी आणि गोवा परिसरात पुढील दोन दिवस वादळी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहरात आज सकाळपासूनच हलक्या सरींना सुरुवात झाली आहे.
🔸 हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस या भागात पावसाची तीव्रता वाढेल. रत्नागिरीसोबतच अहिल्यानगर, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली आहे, ज्यामुळे काही भागांत वीजपुरवठा खंडित झाला आहे. प्रशासनाने अति महत्त्वाच्या कामाशिवाय नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा इशारा दिला आहे.
🔸 रायगड आणि कोकणासह अनेक भागांत अचानक झालेल्या या मुसळधार पावसामुळे शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत सापडला आहे. तोंडाशी आलेले भातपिक या पावसामुळे धोक्यात आले आहे, तसेच आधीच कापणी केलेल्या पिकाचेही नुकसान होण्याची शक्यता आहे. काही शेतकऱ्यांचे पीक वाहून गेले असून शेतात उभे असलेले पाणी निचऱ्याअभावी सडण्याचा धोका निर्माण झाला आहे.
*📣 One Click & Join Spreadit👉 https://www.spreaditnow.in*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*📣 स्प्रेडइटच्या माध्यमातून तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी संपर्क 👉 7030208033*